श्रीरंग उर्फ आप्पा बारणे

खासदार मावळ लोकसभा, महाराष्ट्र.

जय महाराष्ट्र!

पिंपरी- चिंचवड या शहरातुन मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. पहिल्या पासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने या कामात नेहमीच माझे सातत्य राहिले.

श्री दत्त नागरी सह. पतसंस्था, श्री व्यंकटेश्वर नागरी पतसंस्था, त्याचबरोबर ग्लोबल एज्युकेशन सोसायटीचे लक्ष्मीबाई बारणे विद्यालय या विवध संस्थांच्या माध्यमातून कार्य करत राहिलो.

सन १९९७ साली पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सातत्याने सन २००२, सन २००७ व सन २०१२ अशी सलग चार वेळा काम करण्याची मोठी संधी स्थानिक पातळीवर मिळाली. या नगरसेवक पदाच्या कारकीर्दीत सन २००० साली पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदी निवड झाली, तदनंतर सन २००२ ते सन २००५ या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून अतिशय प्रभावी कार्यकाल पार पडला.

या काळात अनेक स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली, आत्ता पर्यंत सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी मुंबई येथे मंत्रालयावर चालत जाऊन मोर्चा, नागपूर विधानभवनावर मोर्चा, स्थानिक प्रश्नासाठी आंदोलन यावर सातत्याने भर देवून प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा आंदोलन व मोर्चाच्या माध्यमातून करीत आलो.

शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकला व युवासेना प्रमुख मानानीय आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने मला मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

पिंपरी चिंचवड महापालिका ते या देशाची लोकसभा हा गेली २० वर्षाचा राजकीय प्रवास… त्यामध्ये अनेक राजकीय चढ-उतार, तसेच अनेक चांगल्या कार्यकर्त्यांची साथ व सर्वसामान्य जन माणसांचे भरभरून प्रेम मिळाले.

देशाच्या लोकसभेत मानानीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच अनेक ज्येष्ठ नेत्यांचा सहवास व संसदेच्या कामकाजाचा अनुभव मला घेता आला. देशाच्या लोकसभेत विविध विषयांवर सर्वाधिक प्रश्न विचाल्यामुळे मला “उत्कृष्ट संसद पटू”चा सन्मान ही पहिल्याच वर्षी मिळाल्याने राजकीय दृष्टीने तो बहुमान माझ्यासाठी मोलाचा ठरला आहे.

लोकप्रतिनिधित्व

सन १९९७ – नगरसेवक – पिंपरी चिंचवड महानगर पालिका
सन २००० – स्थायी समिती अध्यक्ष – पिंपरी चिंचवड महानगर पालिका
सन २००२ – नगरसेवक – पिंपरी चिंचवड महानगर पालिका
सन २००२ – विरोधी पक्ष नेता – पिंपरी चिंचवड महानगर पालिका
सन २००७ – नगरसेवक – पिंपरी चिंचवड महानगर पालिका
सन २०१२ – नगरसेवक – पिंपरी चिंचवड महानगर पालिका
सन २०१४ – खासदार – मावळ लोकसभा मतदार संघ, महाराष्ट्र

 

सदस्यत्व

संरक्षण स्थायी समिती सदस्य, भारत सरकार.
संसदीय राज भाषा समिती सदस्य, भारत सरकार
सल्लागार समिती रोड आणि जहाज वाहतूक
पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य

पुरस्कार:

संसद रत्न पुरस्कार २०१५
राजीव गांधी युवा पुरस्कार २०१४